शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

वसुलीसाठी गेलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचा-यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:25 AM

नांदुरा(बुलडाणा) :  कर्ज वसुली कामी गेलेल्या बेरार फायनान्सच्या दोन कर्मचा-यांना कर्जदाराने बेदम मारहाण केल्याची घटना नांदुरा येथे घडली. याप्रकरणी नांंदुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देचौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदुरा(बुलडाणा) :  कर्ज वसुली कामी गेलेल्या बेरार फायनान्सच्या दोन कर्मचा-यांना कर्जदाराने बेदम मारहाण केल्याची घटना नांदुरा येथे घडली. याप्रकरणी नांंदुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बेरार फायनान्सचे कर्मचारी प्रशांत खंडेराव (वय २८) रा. चांदमारी यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की नांदुरा तालुक्यातील खडदगाव येथील सतीश बिरसिंग चव्हाण याने बेरार फायनान्समधून मोटारसायकलसाठी कर्ज घेतलेले आहे. त्याच्याकडे तीन हप्त्यांचे एकूण ७८०० रुपये थकबाकी असल्याने काल सकाळी सचिन रामप्रसाद चामलाटे या सहका-यासोबत वसुलीसाठी त्याच्याकडे गेलो. यावेळी त्याने पैसे नसल्याने सायंकाळी आणून देतो म्हणून सांगितले. आम्ही सायंकाळपर्यंत नांदुरा येथे थांबलो. यावेळी सचिन चामलाटे यांनी सतीश चव्हाण याला फोन करून पैसे आणून देण्यास सांगितले; मात्र त्याने फोनवर वाद घालून शिवीगाळ केली. त्यानंतर आम्ही खामगावकडे दुचाकीने येत असताना सतीश चव्हाण याचा भाऊ संतोष चव्हाण, संतोष कुवारे, महादेव वानखडे व प्रवीण सावकारे यांनी रस्त्यावर आम्हाला गाठून आमच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडले व बेदम मारहाण करून जखमी केले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या तक्रारीवरून उपरोक्त चौघांविरुद्ध कलम ३०७, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा