बसचालकास मारहाण
By Admin | Updated: March 21, 2017 01:32 IST2017-03-21T01:32:31+5:302017-03-21T01:32:31+5:30
दुचाकीचालकास गाडी बाजूला लावण्याचे सांगितल्यावरून दोघांनी बसचालकास मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना येथील जुना बसस्टॅण्ड चौकात घडली.

बसचालकास मारहाण
खामगाव, दि. २0- दुचाकीचालकास गाडी बाजूला लावण्याचे सांगितल्यावरून दोघांनी बसचालकास मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना येथील जुना बसस्टॅण्ड चौकात घडली. याप्रकरणी बसचालकाच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेगाव आगारातील चालक महादेव हरसिंग पवार (वय ३५) हे रविवारी नांदुरा येथून प्रवासी घेऊन येत असताना येथील जुना बसस्थानक चौकात थांबले. यावेळी त्या ठिकाणी अशोक परदेशी व त्याचा साथीदार रस्त्यामध्ये दुचाकी घेऊन उभे होते. यावेळी चालक पवार यांनी त्यांना ह्यदुचाकी बाजूला घ्या, बसचा धक्का लागेलह्ण असे म्हटले असता, अशोक परदेशी व त्याच्या साथीदाराने पवार यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली व अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चालक पवार यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, पोलिसांनी अशोक परदेशीसह दोघांविरुद्ध कलम ३५३, ३३२, २९४, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.