ऐतिहासीक मोती समाधिस्थळ दुर्लक्षित

By Admin | Updated: January 26, 2015 00:52 IST2015-01-26T00:52:47+5:302015-01-26T00:52:47+5:30

देऊळगावराजा येथील ऐतिहासीक मोती समाधिस्थळाक डे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष.

Historical Moti Museum overlooked | ऐतिहासीक मोती समाधिस्थळ दुर्लक्षित

ऐतिहासीक मोती समाधिस्थळ दुर्लक्षित

अशरफ पटेल/ देऊळगावराजा (बुलडाणा):
जुन्या सिंदखेड राजा रस्त्यावरील माळीपुरा भागातील सावतानगर परिसरात असलेले ऐतिहासिक मोती समाधिस्थळ पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याचा मार्गावर आहे. येथे फक्त फलक आणि प्राचीन काळातील विनातारेचा लोखंडी दरवाजा व खांब रोवलेले आहेत. अशा ऐतिहासिक वास्तूकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
राजे लखुजी जाधव यांच्या काळातील ऐतिहासिक मोती समाधी देऊळगाव राजा शहरातील मध्यवस्तीत असलेल्या सर्वे नंबर २५/0१ मध्ये आहे. या ठिकाणी जिवंत गोड्या व खार्‍या पाण्याचा झरा असलेली विहीर आहे. याशिवाय प्राचीन काळातील दगडी कारंजे आहेत. असा ऐतिहासिक वारसा जतनाची जबाबदारी पुरातत्त्व विभागाची आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मोती समाधिस्थळ नामशेष होण्याचा मार्गावर आहे. देऊळगावराजा शहरापासून ६0 कि.मी. अंतरावर असलेल्या लोणार येथे पुरातत्त्व विभागाचे कार्यालय आहे. या विभागाचे प्राचीन काळातील वास्तू जतन करणे गरजेचे आहे. ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यासाठी निधीही देण्यात येतो; परंतु पुरातत्त्व विभागाकडून निधीचा योग्य वापर होत नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित असलेल्या देऊळगावराजा परिसरातील ऐतिहासिक ठेवा धोक्यात आला आहे. या मोती समाधिस्थळावर सद्य:स्थितीत चौकीदार नाही. सर्वत्र गाजरगवत असून, मोठी झाडे वाढलेली आहेत. त्यामुळे ऐतिहासिक बारवेचे अस्तित्व नष्ट झाले आहे. साफसफाई नसल्यामुळे दुर्लक्षित असलेल्या या ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी पर्यटक येत नाहीत. याची पुरातत्त्व विभागाने दखल घेऊन ऐतिहासिक वारसा जपण्याची गरज आहे.

Web Title: Historical Moti Museum overlooked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.