शेतीच्या वादातून इसमाचा खून

By Admin | Updated: April 25, 2015 02:17 IST2015-04-25T02:17:50+5:302015-04-25T02:17:50+5:30

मलकापूर तालुक्यातील घटना.

His blood from farming controversy | शेतीच्या वादातून इसमाचा खून

शेतीच्या वादातून इसमाचा खून

मलकापूर (जि. बुलडाण) : शेतीच्या वादातून इसमाचा खून झाल्याची घटना २४ एप्रिल रोजी रात्री १0.२0 वाजताचे सुमारास तालुक्यातील लोणवडी शिवारात घडली. लोणवडी येथील अरविंद भगवान पाटील यांना काही इसमांनी शेतीच्या वादातून २४ एप्रिल रोजी रात्रीचे सुमारास मारहाण केली. या मारहाणीत अरविंद पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता अरविंद पाटील हे मृत झाल्याचे आढळून आले. अरविंद पाटील यांना शेतीच्या वादातून मारहाण झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्यासोबत असलेल्यांनी दिली. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी पोलिसांची गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरु होती.

Web Title: His blood from farming controversy