आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:46 IST2021-06-16T04:46:21+5:302021-06-16T04:46:21+5:30

कोविड - १९ सारख्या महामारीमध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता आरोग्य सेवेत कंत्राटी (तात्पुरत्या स्वरूपावर) कर्मचारी काम करीत ...

Hire contract employees from the health department in government service | आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या

आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या

कोविड - १९ सारख्या महामारीमध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता आरोग्य सेवेत कंत्राटी (तात्पुरत्या स्वरूपावर) कर्मचारी काम करीत आहेत. शासकीय कोविड रुग्णालयामध्ये कोविड कंत्राटी कर्मचारी (कोरोना योध्दे) अहोरात्र कोविड रुग्णांची सेवा करून त्यांना कोविडमुक्‍त करीत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात कायमस्वरूपी नोकरी देऊन सेवेत कायम करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर कोविड कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोलकुमार गवई, डॉ. ऋषिकेश देशमुख, संदीप मुंढे, प्रशांत ठेंग, अक्षय गवई, पुष्कर शिंदे, अरुणकुमार शेळके, शे. इमरान शे. मन्नान, संदीप मुंढे, सिध्दांत पवार, कृष्णा कानडजे, शे. शाहरुख, करण गवई, श्रीकांत पवार, रितेश हडाळे, ओम बेंडवाल, शे. परवेज, विठ्ठल ढापसे, भूषण गावे, मारोती औतकर आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Hire contract employees from the health department in government service