अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार आर्थिक मदत
By Admin | Updated: February 27, 2016 01:55 IST2016-02-27T01:55:08+5:302016-02-27T01:55:08+5:30
२0१३ मधील नुकसानग्रस्त शेतक-यांना दिलासा.

अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार आर्थिक मदत
नीलेश शहाकार / बुलडाणा
राज्यात २0१३ मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान अतवृष्टी व पूर यामुळे शे तकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. या दरम्यान राज्यातील आठ जिल्ह्यांत शेती व फळपिकांचे ५0 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याची नोंद शासन दरबारी करण्यात आली. या नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्यांना मदतनिधी देण्याचा निर्णय महसूल व वन विभागाने २५ फेब्रुवारी रोजी घेतला असून, यातून २१ कोटी ४२ लाख ३७ हजारांचा निधी वितरित केला जाणार आहे. यात बुलडाणा जिल्ह्याला ८४ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.
२0१३ च्या ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये जिल्ह्याला गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपून काढले. बर्याच ठिकाणी पुरामुळे शेतजमीन खरवडून निघाली.
यामुळे शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. गहू, हरभरा ही रब्बी पिके, संत्रा, लिंबू, केळी या फळपिकांसह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते.
या नैसर्गिक आपत्तीमुळे या आठ जिल्ह्यांतील जवळपास १ लाख ८२ हजार ९४३ शेतकरी प्रभावित झाले होते.
या नुकसानाबाबत शासनामार्फत सर्व्हे करण्यात आला होता. तसा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. आता शेतकर्यांना दिलासा देत, बाधित शे तकर्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी २१ कोटी ४२
लाख ३७ हजारांचा निधी राज्य शासनाकडून देण्यास मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात नुकसान अहवालाची फेरतपासणी करून १0 मार्चपर्यंत शासनाकडे सादर करायची असून, यानंतर अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यासाठी ८४ लाखांची मदत
बुलडाणा जिल्ह्यात २0१३ मध्ये ६ हजार शेतकर्यांना पावसाचा मोठा फटका बसला. बर्याच ठिकाणी उभी पिके झोपली तर काही ठिकाणी पुरामुळे संपूर्ण शेती खरवडून निघाली होती. चिखली, शेगाव, सिंदखेड राजा, बुलडाणा, मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात १६८ गावे बाधित झाली, तर २९ हजार ७२३ हेक्टर पीक जमिनीचे नुकसान झाल्याची नोंद शासन दरबारी आहे. ही बाब लक्षात घेता, २५ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार बुलडाणा जिल्ह्याला ८४ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.