अंगणवाड्या झाल्या हायटेक

By Admin | Updated: February 28, 2015 01:07 IST2015-02-28T01:07:49+5:302015-02-28T01:07:49+5:30

मेहकर तालुक्यात कॉन्व्हेंटच्या धर्तीवर चिमुकल्यांना शिक्षण.

High-Tech Degeneration | अंगणवाड्या झाल्या हायटेक

अंगणवाड्या झाल्या हायटेक

मेहकर (जि. बुलडाणा): तालुक्यात सुमारे सहा गावांमधील अंगणवाड्या हायटेक झाल्या असून, कॉन्व्हेंटच्या धर्तीवर या अंगणवाड्यातील चिमुकल्यांना शिक्षण मिळत आहे. अंगणवाड्यांमध्ये चिमुल्यांना विविध सुविधा पुरविण्यात येत असल्याने चिमुकल्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण घटले आहे.
मेहकर तालुक्यात ग्रामीण भागामध्ये १९९६ पासून शासनाकडून अंगणवाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. खेडेगावा तील 0 ते ६ वयोगटातील बालकांसाठी ह्या अंगणवाड्या आहेत. बालकांमध्ये लहान पणापासूनच शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, बालकांचा शिक्षणाच्या दृष्टीने बौद्धीक पाया मजबुत व्हावा, त्यांचेवर लहानपणापासूनच चांगले संस्कार घडले पाहिजेत, यासाठी सध्या अंगणवाडी सेविका व मदतनिस प्रयत्न करीत आहेत. अंगणवाड्यामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी लोकांना जागृत करुन लोकसहभागातून सुद्धा विविध उपक्रम अंगणवाड्यामध्ये राबविण्यात येत आहेत. काही ठिकाणच्या पालकांचेही चांगले सहकार्य मिळत असल्याने अंगणवाडीत बालकांची संख्या वाढत आहे. बालकांना छान-छान गाणी, गोष्टी, इंग्रजी भाषा, उजळणी ह्या गोष्टी शिकवल्या जात आहेत. बालविकास प्रकल्प अधिकारी प्रशांत राऊत यांच्या प्रयत्नामुळे तालुक्यातील जानेफळ, देऊळगाव माळी, हिवराखुर्द, बाभुळखेड, बरटाळा, चायगाव सह आदी ठिकाणच्या अंगणवाड्यांची सध्या प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. या ठिकाणच्या अंणवाड्यांना रंग-रंगोटी करण्यात आली असून, अंगणवाडीत विविध संस्कारीत फलक, सुविचार, मुलांना बसण्यासाठी खुच्र्या, चटया यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अंगणवाडीत मुलांची संख्या वाढावी, यासाठी पालकांच्या वेळोवेळी सभा घेऊन अंणगवाडीत आपले पाल्य पाठविण्यासाठी परावृत्त करण्यात येत आहे.
बालकांना दज्रेदार शिक्षण मिळावे, एकही बालक कुपोषित राहू नये, यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. अंगणवाडीतील बालकांची संख्या वाढाविण्यासाठी अंगणवाडीत विविध उपक्रम राबवुन शिक्षण आनंददायी करण्यात येत असल्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी प्रशांत राऊत यांनी सांगीतले.

Web Title: High-Tech Degeneration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.