जडीबुटी दिन

By Admin | Updated: August 6, 2014 00:33 IST2014-08-05T22:36:08+5:302014-08-06T00:33:26+5:30

भारत स्वाभिमान ट्रस्ट व पतंजली योग समिती शाखा शेगावचे वतीने जडीबुटी दिन साजरा करण्यात आला.

Herb day | जडीबुटी दिन

जडीबुटी दिन

शेगाव : भारत स्वाभिमान ट्रस्ट व पतंजली योग समिती शाखा शेगावचे वतीने सोमवार ४ ऑगस्ट रोजी जडीबुटी दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला डॉ.नवृत्ती इंगळे, बबन भुतडा, दीपक गोहेल, सुरज सराफ, गजानन शर्मा, डॉ.महादेव वाघ, गजानन ठाकुर, बाबुराव रोकडे, प्रल्हाद काळे, प्रल्हाद शित्रे, हेमंत वरणकर, गोपाल गावंडे, नरेश थानवी व प्रल्हाद सुलताने यांची उपस्थिती होती.
भारत स्वाभिमान ट्रस्ट शेगावचे अध्यक्ष ज्ञानदेव बोदडे यांनी जडी-बुटी दिवसानिमित्ताने गुळवेळ, पत्थरचट्टा, अँलोविरा, अश्‍वगंधा, नणदुम, दुधी, तुळस, आदी रोपांचे वाटप केले. त्यानंतर योग प्रशिक्षक चतरुभुज मिटकरी विविध योग अभ्यासाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महिला पतंजली योग समिती शाखा शेगावच्यावतीने सौ.राजकुमारी भट्टड, सौ.अनिता धनोकार, सौ.बिना शर्मा, सौ.संगीता धनोकार, सौ.रजनी शेळके, सौ.किरण सराफ, कु.प्रणिता धनोकार या महिला भगिनींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव शेळके, श्रीकृष्ण घनोकार गुरूजी यांच्यासह योग समितीच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले. 

Web Title: Herb day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.