आगग्रस्त कुटुंबाला दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:34 IST2021-03-16T04:34:13+5:302021-03-16T04:34:13+5:30
दिनेश राठाेड यांच्या घराला अचानक आग लागून पाहता पाहता या आगीने रौद्र रूप धारण केले आणि घरातील साहित्यांनी ...

आगग्रस्त कुटुंबाला दिला मदतीचा हात
दिनेश राठाेड यांच्या घराला अचानक आग लागून पाहता पाहता या आगीने रौद्र रूप धारण केले आणि घरातील साहित्यांनी पेट घेतला. या आगीत घरावर असलेली टिन पत्रे, कपडे, इलेक्ट्रिकच्या वस्तू, अन्नधान्य, शेतीचे साहित्य, दैनंदिन वापरातील वस्तू जळून खाक झाल्या होत्या. गावातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या घटनेमुळे कुटुंबाचा संसार उघड्यावर आला असल्याने पीडित कुटुंबाला मदतीची नितांत गरज असल्याचे शहीद कुटुंबीयांचे प्रमुख प्रवीण राठोड यांना समजताच त्यांनी हात्ता येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना रोख ११ हजार रुपये मदत दिली. या वेळी मानवता फाउण्डेशनचे विश्वस्त अरविंद चव्हाण, अनिल राठोड, ग्रामस्थ हजर होते.