आगीच्या घटनेने बेघर झालेल्या कुटुंबास मदत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:43 IST2021-04-30T04:43:59+5:302021-04-30T04:43:59+5:30
तालुक्यातील मेरा बु. येथे २६ एप्रिल रोजी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घर व आरामशीन भस्मसात झाल्याने अशोक सुरूशे यांचे संपूर्ण ...

आगीच्या घटनेने बेघर झालेल्या कुटुंबास मदत !
तालुक्यातील मेरा बु. येथे २६ एप्रिल रोजी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घर व आरामशीन भस्मसात झाल्याने अशोक सुरूशे यांचे संपूर्ण कुटुंबाची मोठी हानी झाली आहे. तथापि आगीच्या घटनेने बेघर होण्यासह उदरनिर्वाहाचेही साधन हिरावल्याने त्यांना मदत देण्याचे आवाहन करण्यात आले होते. याची दखल घेत बारा बलुतेदार संघटनेचे नेते सतीष शिंदे व सहकाऱ्यांनी या कुटुंबास किराणा व इतर साहित्याची मदत दिली आहे.
आगीच्या घटनेने उद्ध्वस्त झालेल्या मेरा.बु. येथील अशोक सुरूशे यांना मेरा.बु. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मदत दिली. दरम्यान, ग्रामस्थांनी तालुक्यातील इतर दानशुरांनादेखील मदत देण्याबाबत साद घातली होती. याची दखल घेत बारा बलुतेदार संघटनेचे नेते सतीष शिंदे यांनी अशोक सुरूशे यांच्या घरी जाऊन किराणा, कपडे व इतर संसारोपयोगी साहित्य देऊन मानसिक आधार दिला आहे. यावेळी अनंत राऊत, राहुल इंगळे, वसंता खराटे, गोपाल सांगळे उपस्थित होते.