शेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; झाडे पडली, वाहतूकही झाली विस्कळीत

By विवेक चांदुरकर | Published: April 23, 2024 04:40 PM2024-04-23T16:40:25+5:302024-04-23T16:41:04+5:30

अनेकांच्या घरावरील छत उडून गेले असून, वीजेचे खांबही पडले.

Heavy rains with gale-force winds lash Shegaon taluk; Trees fell, traffic was disrupted | शेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; झाडे पडली, वाहतूकही झाली विस्कळीत

शेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; झाडे पडली, वाहतूकही झाली विस्कळीत

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव जि. बुलढाणा: जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच अनेकांच्या घरावरील छत उडून गेले असून, वीजेचे खांबही पडले.

शेगाव तालुक्यात मंगळवारी दुपारी २ ते ३ वाजताच्या दरम्यान वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. तसेच काही भागात गारपीट झाली. या पावसामुळे शेगाव ते आकोट मार्गावर झाडे पडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळाकरिता ठप्प झाली होती. तसेच शेगाव शहरात ठिकठिकाणी झाडे पडली. वीजेचे खांब पडले. विविध फलकही पडले. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे व्यावसायिकांचेही नुकसान झाले. भाजीपाला विक्रेते, कापड विक्रेते तसेच माठ विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे ज्वारीसह अन्य पिकांना फटका बसला आहे. वादळी वाऱ्याने ज्वारी जमीनदाेस्त झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. रब्बी हंगामात तिसऱ्यांदा पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

Web Title: Heavy rains with gale-force winds lash Shegaon taluk; Trees fell, traffic was disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.