शेगावात वादळी वा-यासह जोरदार पाऊस
By Admin | Updated: May 9, 2016 02:09 IST2016-05-09T02:09:48+5:302016-05-09T02:09:48+5:30
बुलडाणा येथेही बरसल्या सरीं.

शेगावात वादळी वा-यासह जोरदार पाऊस
शेगाव (जि. बुलडाणा): वादळी वार्यासह शेगाव परिसरात शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली.
आलेल्या पावसाने संपूर्ण परिसराला झोडपून काढलं. कालखेड, भोनगाव, आडसुळ, जवळा, चिंचोली जलंब, माटरगावसह तालुक्यात सोसाट्याचा वारा आणि पावसानं कहर केला. यात अनेक घरांवरचे टीन उडून गेले, तर मोठी झाडं उन्मळून पडली. गेल्या तीन दिवसांपासून दुपारनंतर अचानक आकाशात काळे ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटात वादळाला सुरुवात होत आहे. कांदा पीक या वादळानं उद्ध्वस्त केले आहे. अनेक गावातील इलेक्ट्रिक खांब आणि तार तुटून पडल्याने लाइन बंद आहे.
बुलडाण्यात पाऊस
बुलडाणा शहर परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते; मात्र दुपारी ४ वाजेदरम्यान रिमझिम पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे रविवारच्या बाजारातील काही दुकाने उठली. पाऊस जवळपास १0 मिनिटे सुरू असल्यामुळे अनेक व्यापार्यांनी आपली दुकाने बंद केली. त्यानंतर मात्र संध्याकाळी ढगाळ वातावरण कायम होते.