शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात दीड महिन्यात १७ जणांना उष्माघाताचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 17:18 IST

बुलडाणा : हवामान बदलाचोे फरक आता प्रत्यक्ष जाणवत असतानाच यावर्षी उन्हाळ््याची दाहकताही तुलनेने अधिक जाणवत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात तब्बल १७ जणांना उष्माघाताचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देशेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात ११ जणांना उष्माघाताचा फटका बसल्याने दाखल केले होते. सहा वर्षाच्या मुलापासून ते ६५ वर्षाच्या वृद्धापर्यंतचा यामध्ये समावेश आहे. दर तीन दिवसाआड एका व्यक्तीला उष्माघाताच फटका बसत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे.

बुलडाणा : हवामान बदलाचोे फरक आता प्रत्यक्ष जाणवत असतानाच यावर्षी उन्हाळ््याची दाहकताही तुलनेने अधिक जाणवत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात तब्बल १७ जणांना उष्माघाताचा फटका बसला आहे. सुदैवाने यातील सर्वजण सुखरूप असून त्यांना रुग्णालयातून सुटीही देण्यात आली आहे.प्रामुख्याने या १७ जणामध्ये घाटाखालील विशेषत: शेगाव तालुक्याच्या परिसरातील नागरिकांची संख्या अधिक असल्याचे एकंदरीत आकडेवारी पाहता स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालायत आतापर्यंत पाच जणांना तर खामगाव येथील रुग्णालयात एकाला आणि शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात ११ जणांना उष्माघाताचा फटका बसल्याने दाखल केले होते. सहा वर्षाच्या मुलापासून ते ६५ वर्षाच्या वृद्धापर्यंतचा यामध्ये समावेश आहे. दर तीन दिवसाआड एका व्यक्तीला उष्माघाताच फटका बसत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघातामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या कपील एकनाथ हिवाळे (२०), नीलेश एकनाथ मिसाळ (२३), गायत्री कडूबा अव्हाड (६), शेख शकील शेख सलीम (६) आणि रमेश सीताराम पवार (४०) यांना सुटी देण्यात आली आहे. खामगाव येथेही दाखल करण्यात आलेल्या शत्रूघ्न इंगळे यासही सुटी देण्यात आली आहे. शिरपूर, नांद्राकोळी, धाड, धावडा आणि बुलडाण्यातील मिलींदनगरमधील या व्यक्ती रहिवाशी आहे.

शेगाव रुग्णालयात संख्या अधिकउष्माघाताच्या उपचारासाठी दाखल झालेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या शेगाव रुग्णालयातील आहे. माहदेव सुखदेव वाकेकर (मलकापूर), रामदास श्रीराम आव्हाड (चांगेफळ, जळगाव जामोद), बालू भावराव वानखेडे (शेगाव), रमाबाई भघवान म्हस्के (चांगवा, संग्रामपूर), शालिग्राम तुळशीराम उमरावाटे (सगड, अकोला), बाळकृष्ण  रामकृष्ण गवई (शेगाव), बाबाराव वामन इंगळ (चिंचोली, शेगाव), सुनील ग्यानसींग खानंन्दे (मुक्ताईनगर, जळगाव खान्देश), संजय किसन पवार (शेगाव), अंबादास विठोबा सुरूशे (गोलखेड, शेगाव), सुनील श्यामराव नानंदे (शेगाव) यांचा समावेश आहे. दरम्यान, उष्माघाताचा फटका बसलेल्या या सर्व व्यक्तींना  रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून त्यांची प्रकृतीही चांगली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHeat Strokeउष्माघातShegaonशेगाव