सानंदांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर २ जून राजी सुनावणी
By Admin | Updated: May 26, 2017 01:37 IST2017-05-26T01:37:45+5:302017-05-26T01:37:45+5:30
खामगाव : शिवाजी व्यायाम मंदिर गैरव्यवहारप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात माजी आ.दिलीपकुमार सानंदा व इतरांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर आता २ जून रोजी सुनावणी होणार आहे.

सानंदांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर २ जून राजी सुनावणी
शिवाजी व्यायाम मंदिर प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील शिवाजी वेस भागातील श्री शिवाजी व्यायाम मंदिर गैरव्यवहारप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात माजी आ.दिलीपकुमार सानंदा व इतरांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर आता २ जून रोजी सुनावणी होणार आहे.
शिवाजी व्यायाम मंदिर गैरव्यवहारबाबत २३ मे रोजी नगर परिषदेचे नगर अभियंता निरंजन जोशी यांनी मुख्याधिकारी यांच्यावतीने व त्यांनी दिलेल्या आदेशानुसार शिवाजी नगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरुन पोलिसांनी ११ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी शिवाजी व्यायाम मंदिराचे अध्यक्ष गोकुलचंद सानंदा तसेच माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांनी गुन्हे दाखल होण्यापूर्वी अंतरिम अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केल्यानंतर दोघांनाही २५ मे पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. या अंतरिम अटकपूर्व जामिनावर २५ मे रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती, तसेच गुन्हे दाखल झाल्यानंतर याप्रकरणी दिगंबर खासणे, महावीर थानवी, कांतीचंद भट्टड यांनी अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी २४ मे रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला असता, हा अर्जही आदेशासाठी २५ मे रोजी ठेवण्यात आला होता. दरम्यान, २५ मे रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली असता, गोकुलचंद सानंदा, माजी.आ.दिलीपकुमार सानंदा, दिगंबर खासणे, महावीर थानवी, कांतीचंद भट्टड यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी २ जून रोजी न्यायालयाने ठेवली आहे. तर २३ मे रोजी माजी नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा व सरस्वतीताई खासणे यांनीही अंतरिम अटकपूर्व जामीन मिळविला होता. या जामिनावरही सुनावणी झाली असता, या दोघांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी २९ मे रोजी ठेवण्यात आली आहे.