आरोग्य कर्मचारी ठरू शकतात कोरोना संक्रमणास जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 11:04 IST2021-04-07T11:04:04+5:302021-04-07T11:04:22+5:30
Corona infection : कोरोना वॉर्डात काम करणारे कर्मचारी पूर्वीप्रमाणे काही दिवस क्वारंटाइन न राहता थेट घरी जात आहेत.

आरोग्य कर्मचारी ठरू शकतात कोरोना संक्रमणास जबाबदार
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोना वॉर्डात काम करणारे कर्मचारी पूर्वीप्रमाणे काही दिवस क्वारंटाइन न राहता थेट घरी जात आहेत. हे कर्मचारी कोरोना पसरविण्यासाठी जबाबदार ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.
कोरोना विषाणूमध्ये संसर्ग पसरविण्याची क्षमता अधिक असल्याने एकमेकांपासून काही अंतर पाळण्याचे आवाहन शासन व आरोग्य यंत्रणेमार्फत केले जात आहे. कोरोना रुग्णांची बाधा इतर रुग्णांना होण्याची शक्यता असल्याने कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड ठेवण्यात आला आहे. या वॉर्डात काम करणारे डॉक्टर व आरोग्य कर्मचाºयांनाही कोरोनाची बाधा होण्याची शक्यता असल्याने त्यांना पीपीई किट घालूनच वॉर्डात प्रवेश करावा लागतो.
यापूर्वीच्या कोरोना लाटेच्या वेळी कोरोना वॉर्डात काम करणाºया डॉक्टर व आरोग्य कर्मचाºयांची काही दिवस सलग नेमणूक केली जात होती. त्यानंतर त्यांना काही दिवस क्वारंटाइन ठेवले जात होते. कोरोनाची भीती असल्याने हे कर्मचारी व डॉक्टर घरीही जात नव्हते. क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर त्यांना इतर वॉर्डामध्ये नेमणूक दिली जात होती.
या कालावधीत ते घरी जात होते. त्यामुळे त्यांचे कुटुंब कोरोनाच्या संसगार्पासून सुरक्षित राहत होते. कोरोनाच्या दुसºया लाटेत मात्र कोरोना वॉर्डात काम करणारे आरोग्य कर्मचारी व डॉक्टर कोरोना वॉडार्तून थेट घरीच जात आहेत.
त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला कोरोनाचा धोका होण्याची शक्यता आहे.
त्यांच्या कुटुंबाचा संसर्ग इतर सामान्य नागरिकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना थेट घरी जाण्यावर प्रतिबंध घालण्याची गरज आहे.