दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:36 IST2021-04-20T04:36:00+5:302021-04-20T04:36:00+5:30
नागरिकांना दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत आहे. त्यामधून अनेक प्रकारचे आजार शहरांमध्ये पसरत आहेत. खारे पाणी पाजून नागरिकांच्या ...

दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्य धोक्यात
नागरिकांना दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत आहे. त्यामधून अनेक प्रकारचे आजार शहरांमध्ये पसरत आहेत. खारे पाणी पाजून नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांकडून सर्व प्रकारचे कर वसूल केले जातात. मात्र, त्यांना त्या प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत. एकीकडे कोरोना संसर्गाच्या आजारामुळे नागरिक त्रस्त आहेत. तर, दुसरीकडे अशुद्ध पाणीपुरवठा करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडत आहे. शहरवासीयांना शुद्ध पाणी मिळाले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनेे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेे आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष सुनील घाटे, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत धाबे, सुनील कोल्हे, डॉ. शरद काळे, सुधाकर सुरळकर, अब्दुल्ला पठाण, संदीप वानखडे, महेश ढोण सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.