शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गोवर, रुबेलाच्या ‘टार्गेट’साठी आरोग्य विभागाची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 18:02 IST

बुलडाणा: जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरणाचे काम ८० टक्क्यापर्यंत झाले असून लसीकरणाच्या उद्दिष्ट पुर्ततेसाठी १५ जानेवारीची मुदत आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. आतापर्यंत लसीकरण झालेल्यांची संख्या साडे पाच लाखापर्यंत गेली आहे; मात्र आतापर्यंत जिल्ह्यात सात लाख लाभार्थ्यांना लसीकरण करणे अपेक्षीत होते, त्यामुळे गोवर रुबेलाच्या टार्गेट पुर्ततेसाठी आरोग्य विभागाची धावपळ सुरू आहे

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरणाचे काम ८० टक्क्यापर्यंत झाले असून लसीकरणाच्या उद्दिष्ट पुर्ततेसाठी १५ जानेवारीची मुदत आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. आतापर्यंत लसीकरण झालेल्यांची संख्या साडे पाच लाखापर्यंत गेली आहे; मात्र आतापर्यंत जिल्ह्यात सात लाख लाभार्थ्यांना लसीकरण करणे अपेक्षीत होते, त्यामुळे गोवर रुबेलाच्या टार्गेट पुर्ततेसाठी आरोग्य विभागाची धावपळ सुरू आहे. गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत २७ नोव्हेंबरपासून राज्यभर व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. गोवर मुळे भारतात दरवर्षी ५० हजार जण मृत्यूमुखी पडतात. गोवरमुळे रुग्णाच्या शरीरातील ‘अ’ जीवनसत्वाचे प्रमाण खूप कमी होते. रुबेला हा गर्भवती मातेला झाल्यास तिचा गर्भपात होऊ शकतो.  बालकास मोतिबिंदू, ह्रदयविकार, मतिमंदत्व,  बहिरेपणा व शरीराची वाढ खुंटणे आदी आजार होऊ शकतात. रुबेला हा पूर्णपणे संसर्गजन्य आहे. भावी पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी हे लसीकरण आवश्यक असल्याने सर्वत्र ही मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात नऊ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या सुमारे ३ कोटी ३८ लाख बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार उदिष्ट पुर्ततेसाठी राज्यातून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत आहे. लसीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाच्या हालचाली सुरू आहेत. जिल्ह्यात लाभार्थ्यांना यशस्वी लसीकरण झालेल्यांची संख्या साडे पाच लाखांवर गेली असून उद्दिष्ट पुर्ततेसाठी १५ जानेवारीची मुदत आरोग्य प्रशासनाला देण्यात आलेली आहे. त्यानुसार सध्या आरोग्य विभागाचे कर्मचारी कामाला लागले असल्याचे दिसून येते. 

 शेवटचे दोन आठवडे मोहिमेत लसीकरण न झालेल्यांसाठीपहिल्या सत्रात पहिल्या दोन आठवड्यांत सर्व शाळांमध्ये मोहीम राबविण्यात आली. त्यापुढील दोन आठवडे अंगणवाडी, फिरत्या पथकाद्वारे व बाह्य संपर्क लसीकरण सत्र राबविण्यात आले आहे. अशा प्रकारे लाखो बालकांना लसीकरण देण्यात आले आहे. मात्र आता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये ज्या बालकांचे या मोहिमेत लसीकरण झालेले नाही त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. 

 लसीकरण शेवटच्या टप्यातनोव्हेंबर अखेरपासून सुरू असलेले गोवर, रुबेला लसीकरण काम सध्या शेवटच्या टप्प्यात आले आहे. लसीकरणासाठी दिलेली मुदतही जवळ येत असल्याने आरोग्य विभागाकडून गावोगाव पिंजून काढण्यात येत आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी सध्या लसीकरणाच्या उद्दिष्ट पुर्तीच्या कामात व्यस्त दिसून येत आहेत. 

 ७ लाख लाभार्थी होणे अपेक्षीतजिल्ह्यात गोवर, रुबेला लसीकरणाची संख्या आजपर्यंत सात लाखावर होणे अपेक्षीत होते. मात्र ५ लाख ५७ हजार ८६६ बालकांना लसीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरीत बालाकांपर्यंत लसीकरण पोहचविण्याच्या कामात गती वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

 जिल्ह्यात ८० टक्के गोवर, रुबेला लसीकरणाचे काम पुर्णत्वास गेले आहे. नियमीत लसिकरणाचे काम गतीमान करण्यासाठी सहकार्याची गरज आहे. मोहीमेमध्ये लसीकरण बाकी असलेल्या बालकांना तातडीने लस देण्यात यावी.- डॉ. रविंद्र गोफने, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, बुलडाणा.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य