देऊळघाट येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदाेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:34 IST2021-02-10T04:34:57+5:302021-02-10T04:34:57+5:30

बुलडाणा : तालुक्यातील देऊळघाट येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चार बालकांवर जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी घडली. ...

The head of a stray dog at Deulghat | देऊळघाट येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदाेस

देऊळघाट येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदाेस

बुलडाणा : तालुक्यातील देऊळघाट येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चार बालकांवर जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी घडली. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लहान मुलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

देऊळघाट येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हैदोस घालायला सुरुवात केली. हा कुत्रा संपूर्ण गावात फिरत असून एकट्या लहान मुलांवर झडप घालून चावा घेत पुन्हा सैरावैरा पळून जात आहे. त्यामुळे एका ठिकाणी न थांबणाऱ्या या कुत्र्याचा शोध लावणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता मुलांना व ग्रामस्थांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. साेमवारी या पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात मोहम्मद फैजान मोहम्मद जाकीर अन्सारी, कासीम खान आसीफ खान, माविया खान मुंतजीर खान व गजानन स्वप्निल देशमुख या चौघांना चावा घेतल्याने, ते जखमी झाले आहेत. चारही बालकांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील इतरही तीन ते चार जणांना चावा घेतला आहे. या कुत्र्याचा बंदाेबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: The head of a stray dog at Deulghat