ग्रामविकास अधिका-यास मारहाण
By Admin | Updated: December 29, 2015 01:57 IST2015-12-29T01:57:16+5:302015-12-29T01:57:16+5:30
सुंदरखेड ग्रामपंचायत सदस्याविरूद्ध गुन्हा दाखल

ग्रामविकास अधिका-यास मारहाण
बुलडाणा : सुंदरखेड येथील ग्राम विकास अधिकार्यास मारहाण केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्याविरुद्ध २८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामविकास अधिकारी विलास मानवतकर आपल्या कार्यालयात सकाळी १0 वाजता कार्यालयीन काम करीत होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव यांनी कार्यालयात येवून एक काम करण्यास सांगितले; मात्र मानवतकर यांनी हे काम बैठकीत ठराव घेतल्यानंतर होईल, असे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव यांनी मारहाण केल्याची तक्रार मानवतकर यांनी दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.