देऊळगाव राजा पंचायत समिती सभापतीपदी हरिभाऊ शेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:36 IST2021-07-27T04:36:28+5:302021-07-27T04:36:28+5:30

सहा सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीचे सभापतीपद गेल्या महिनाभरापासून रिक्त होते़ माजी सभापती रेणुका बुरकुल यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे ...

Haribhau Shete as Deulgaon Raja Panchayat Samiti Chairman | देऊळगाव राजा पंचायत समिती सभापतीपदी हरिभाऊ शेटे

देऊळगाव राजा पंचायत समिती सभापतीपदी हरिभाऊ शेटे

सहा सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीचे सभापतीपद गेल्या महिनाभरापासून रिक्त होते़ माजी सभापती रेणुका बुरकुल यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सभापती पदासाठी साेमवारी निवडणूक घेण्यात आली़ सहा सदस्य संख्या असलेल्या सदस्यांमध्ये चार सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तर एक भाजपा आणि एक शिवसेना असे पक्षीय बलाबल आहे़ त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक हाती सत्ता असलेल्या सभापती पदासाठी नामांकन भरते वेळेस हरिभाऊ गंगाराम शेटे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला़ त्यामुळे त्यांची अविरोध निवड करण्यात आली़ यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सारिका भगत यांनी काम पाहिले़ यावेळी पंचायत समिती सदस्य रेणुका बुरकुल, कल्याणी शिंगणे, शारदा सानप, भगवान खंदारे आदी उपस्थित होते तर एक सदस्य अनुपस्थित होता़ यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती रियाज खान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गंगाधर जाधव, तालुका अध्यक्ष राजू शिरसाठ ,गणेश सवडे ,संतोष खांडेभराड ,आकाश जाधव, अरविंद खांडेभराड आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते़

Web Title: Haribhau Shete as Deulgaon Raja Panchayat Samiti Chairman