गारपीटग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा
By Admin | Updated: November 24, 2014 00:21 IST2014-11-24T00:21:24+5:302014-11-24T00:21:24+5:30
प्रशासनाची दिरंगाई बुलडाणा जिल्ह्यातील महारचिकना परिसरा तील २0२ गारपीटग्रस्त शेतकरी वंचित.
_ns.jpg)
गारपीटग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा
महारचिकना (बुलडाणा) : परिसरात फेब्रवारी- मार्च मध्ये परिसरा तील बर्याच गावांना अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा बसला. यामुळे शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानाचा सर्वे करण्यात आला. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्या २0२ गारपीटग्रस्तांना अद्यापही शासनाच्या अर्थिक मदतिची प्रतिक्षा आहे.
महारचिकना परिसरात फेब्रुवारी-मार्च २0१४ मध्ये गारपीटीचे आसमानी संकट कोसळल होते. गारपीटीने शेतकर्यांचे रब्बी िपकांचे मोठय़ाप्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना अर्थिक मदत देण्यासाठी शासनाच्यावतीने गारपीटग्रस्त भागाचा सर्वे करण्यात आला होता. परंतू, काहीच शेतकर्यांना त्याचा लाभ मिळाला. येथील २0२ शेतकरी आजही शासनाच्या अर्थिक मदती पासून वंचीत आहेत. त्या शेतकर्यांना मदत मिळावी म्हणून वेळोवेळी संबंधित अधिकार्यांना विचारणा केली. परंतु शे तकर्यांना उडवाउडवीची उत्तरेच मिळाली. त्यामुळे गावकर्यांनी गावच विक्रीला काढले होते. त्याचा सुद्धा काही फायदा झाला नाही. त्यामुळे मदतीपासून वंचित शेतकर्यांनी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस व महसुल मंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांच्याकडे निवेदन पाठवुन मदतीची मागणी केलेली आहे.