गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित
By Admin | Updated: July 7, 2014 22:55 IST2014-07-07T22:43:17+5:302014-07-07T22:55:00+5:30
चूकीचा सर्व्हे करणार्यांवर कारवाई करा

गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित
कोयाळी दहातोंडे : लोणार तालुक्यातील सोमठाणा येथे तलाठय़ांनी गारपीटीचा सर्वे चुकीचा केल्यामुळे अनेक गारपीटग्रस्त शेतकरी शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचित आहेत.
मार्च महिन्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने सोमठाणा येथील शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाचा तलाठी पाडवी यांनी घरी बसूनच सर्वे केल्याची तक्रार सोमठाणा येथील शेतकर्यांनी लोणार तहसिलदारांकडे केली आहे. तसेच तलाठी पांडव यांच्या चुकीच्या सर्वेमुळे अनेक नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित आहेत. मनोहर बुरकूल, गणेश भागडे, कचरु वानखेडे यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असूनही त्यांची नावे गारपीटग्रस्त सर्वेक्षणात टाकण्यात आली नाही. याकडे वरिष्ठांनी तात्काळ लक्ष देवून शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यात यावी व चुकीचा सर्व्हे करणार्यावर कारवाई करावी, अशी मागणी तहसिलदार लोणार यांच्याकडे सोमठाणा येथील शेतकर्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनावर गणेश भागडे, मनोहर बुरकूल, कचरु वानखेडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.