धाड येथे ८५ हजाराचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST2021-06-24T04:24:02+5:302021-06-24T04:24:02+5:30
धाड येथील बसस्टँड परीसरात आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या स्वीट मार्ट दुकानामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अवैधरीत्या गुटख्याची विक्री ...

धाड येथे ८५ हजाराचा गुटखा जप्त
धाड येथील बसस्टँड परीसरात आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या स्वीट मार्ट दुकानामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अवैधरीत्या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नीलेश अपसुंदे,पीएसआय गजानन मुंडे,सागर पेंढारकर आदींनी धाड टाकून शे.शाहीद शे.सलीम आणि आकाश शांताराम सिरसाट यांच्याकडून ६७ हजार ८२५ व १६ हजार ६२० रुपयाचा गुटखा जप्त केला आहे़ धाड परिसरात मागील काही महिन्यापासून गुटख्याची तस्करी आणि अवैध विक्री व्यवसाय बेफाम सुरू आहे़ याबाबतीत स्थानिक पोलिसांनी आज केलेल्या कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे़
गुटखा विक्री करणारे रॅकेट सक्रिय
ग्रामीण भागात पोहोच गुटखा विक्री करणारे रॅकेटच सक्रिय असून, यावरही पोलिसांनी पायबंद घालण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे़ मात्र आज धाड पोलिसांनी गुटखा तस्करी करणाऱ्या एका भागावर कारवाई केल्याने सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या घटनेतील दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांच्यावर अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ याप्रकरणी अधिक तपास धाड पोलीस करीत आहेत.