शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मध्यप्रदेशातून गुटख्याची विदर्भात एंट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 11:08 IST

Gutkha entry from Madhya Pradesh to Vidarbha : खामगाव औद्योगिक वसाहतीत कोट्यवधी रुपयांची गुटख्याची साठेबाजी करण्याची हिंमत काही माफियांनी केलेली आहे.  

- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा मध्य प्रदेशातून विदर्भातील अकोला जिल्ह्यापर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्हाणपूर येथून जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पहूरमार्गे मालवाहू वाहनांतून राजरोसपणे आणला जातो. त्यासाठी ७ क्विंटल क्षमतेच्या वाहनापोटी दरमहा  ६० हजार रुपये विविध ठाण्यांतील पोलिसांवर खर्च होत असल्याची माहिती आहे. त्यामुळेच खामगाव औद्योगिक वसाहतीत कोट्यवधी रुपयांची गुटख्याची साठेबाजी करण्याची हिंमत काही माफियांनी केलेली आहे.  राज्यात गुटखा प्रतिबंधित आहे. मात्र, विदर्भात ग्रामीण भागात हा गुटखा सहजपणे उपलब्ध आहे आणि अव्वाच्या सव्वा दराने त्याची विक्री होत आहे. गुटख्याची किंमत वाढण्यामागे वाहतूक खर्च अधिक असल्याचे कारण आहे. बऱ्हाणपूर येथे गुटखा माफियांचे मुख्य केंद्र आहे. तेथून जामनेर तालुक्यात गुटखा रात्रीच्या अंधारात आणला जातो व तेथून त्याच तालुक्यातील पहूरला पोहोचतो. खामगाव तसेच अकोला येथे तो आणण्यासाठी छोट्या वाहनांचा वापर  होतो. त्यात खाद्यपदार्थांची हलकी पाकिटे कोंबली जातात. त्याखाली गुटख्याची पोती दडवून गुटखा पोहोचवला जातो. काही गुटखा माफिया वाहनचालक पोलिसांची नजर चुकवण्यासाठी दिवसाढवळ्या वाहतूक केली जाते.

मलकापूर, नांदुरा, बोराखेडी, पिंपळगाव हद्दीतून वाहतूकविशेष म्हणजे, गुटखा खामगाव, अकोल्यात पोहोचवण्यासाठी मलकापूर, बोराखेडी, नांदुरा, पिंपळगावराजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहतूक केली जाते. खामगाव वगळता कुठेही कारवाई होत नसल्याने गुटखा माफियांचा छोट्या गाडीमागे होत असलेला ६० हजार रुपये मासिक खर्च ‘सत्कारणी’ लागत आहे.

अकोल्यात खडकी पुलाजवळ साठाखामगाव शहरातील बर्डे प्लाॅट, औद्योगिक वसाहतीतील गोदामात गुटख्याचा सर्रास व्यापार केला जातो. तर खामगावातीलच काहींनी थेट अकोल्याशी संधान साधले आहे. खाद्यपदार्थांच्या पाकिटासह गुटखा दररोज सकाळी अकोल्यात पोहोचतो. मंगरूळपीर मार्गावर राष्ट्रीय महामार्गाच्या खडकी अंडरपासजवळ असलेल्या गोदामात गुटखा उतरवला जातो. जैन नामक व्यक्तीचे हे गोदाम आहे. तेथून सकाळी ११ वाजेपर्यंत गुटखा अकोला शहरातील पान टपऱ्या, किराणा दुकानांत पोहोचतो. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव