मेहकर तालुक्यात साडेचार लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST2021-06-25T04:24:57+5:302021-06-25T04:24:57+5:30

मेहकर तालुक्यात अवैध गुटखा विक्री हाेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली़. या माहितीच्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ...

Gutka worth Rs 4.5 lakh seized in Mehkar taluka | मेहकर तालुक्यात साडेचार लाखांचा गुटखा जप्त

मेहकर तालुक्यात साडेचार लाखांचा गुटखा जप्त

मेहकर तालुक्यात अवैध गुटखा विक्री हाेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली़. या माहितीच्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याणा व बदनापूर येथे धाड टाकली़. आरोपी उद्धव पंढरी गरोळे (रा. कल्याणा) व अश्रूबा दादाराव आसोले (रा. बदनापूर) यांच्याकडून चार लाख ४३ हजार ७५ रुपयांचा ऐवज जप्त केला़. ही कारवाई सपोनि मनीष गावंडे, पोहवा सुधाकर काळे, पोना संजय नागवे, पाेशि गणेश शेळके, चालक सुधाकर बरडे यांनी केली़.

माेठ्या गावांमध्ये कारवाईची गरज

मेहकर तालुक्यात सर्वच गावांत गत काही दिवसांपासून अवैध गुटखा विक्री हाेत आहे. हिवरा आश्रम, डोणगाव, जानेफळ, अंजनी बु, मेहकर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सुलतानपूर येथेही कारवाई करण्याची गरज आहे़. गुटखा विक्री सर्वच भागात सुरू असताना काही ठिकाणीच कारवाई करण्यात येत आहे़. त्यामुळे कारवाया वाढवण्याची गरज आहे.

Web Title: Gutka worth Rs 4.5 lakh seized in Mehkar taluka