जनावरांच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याकरिता मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:36 IST2021-08-26T04:36:27+5:302021-08-26T04:36:27+5:30
यामध्ये निकृष्ट चाऱ्यावर गूळ आणि युरियाची प्रक्रिया केल्यास निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता कशी वाढते, यावर मार्गदर्शन केले. उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने पाण्याच्या ...

जनावरांच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याकरिता मार्गदर्शन
यामध्ये निकृष्ट चाऱ्यावर गूळ आणि युरियाची प्रक्रिया केल्यास निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता कशी वाढते, यावर मार्गदर्शन केले. उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने पाण्याच्या कमतरतेमुळे हिरवा चारा घेणे अशक्य होते. अशा वेळेस उत्पादित पिकाचा चारा म्हणून उपयोग होतो. या प्रक्रियेमुळे चाऱ्याच्या चवीमध्ये फरक पडून चारा वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. दूध उत्पादन वाढीस मदत होते. याचा जनावरांच्या आरोग्यावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही. यावेळी शेतकरी अतुल शिंदे, हर्षल शिंदे, सुखदेव शिंदे, कैलास शिंदे, दीपक निखाडे यांच्यासह बरेच शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एच. वसू, प्रा. प्रदीप निचळ, कार्यक्रम अधिकारी प्रा. शशिकांत वाकुडकर, प्रा. डी. टी. बोरकर व विषयतज्ज्ञ प्रा. राधेश्याम डाखोरे सर व इतर प्राध्यापकवर्गाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
250821\img-20210825-wa0126.jpg
शेतकरी बांधवाना चारा तयार करून दाखविताना