ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना बांधावर करणार मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:33 IST2021-09-13T04:33:04+5:302021-09-13T04:33:04+5:30
देऊळगाव राजा : शेतकऱ्यांना ई पीक पाहणीनुसार शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची सूचना शासनाच्यावतीने करण्यात आली आहे. ई पीक ...

ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना बांधावर करणार मार्गदर्शन
देऊळगाव राजा : शेतकऱ्यांना ई पीक पाहणीनुसार शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची सूचना शासनाच्यावतीने करण्यात आली आहे. ई पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. अनेक शेतकऱ्यांना याविषयी माहिती नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देऊळगाव राजा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे़
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे़ विधानसभा क्षेत्राध्यक्ष गजानन पवार पुढाकार घेत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन संदर्भात आवाहन केले आहे़ तालुक्यातील किनगाव राजा, सोनोशी, दुसरबीड, बीबी, शेंदुर्जन, साखरखेडा, सावखेड भोई, सिनगाव जहागीर, देऊळगाव मही, मेरा, या ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रशिक्षक देऊन १३ सप्टेंबरपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार असल्याची माहिती विधानसभा क्षेत्राध्यक्ष गजानन पवार आणि राष्ट्रवादीचे युवा पदाधिकारी अरविंद खांडेभराड यांनी दिली आहे.