कृषिकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:40 IST2021-08-20T04:40:23+5:302021-08-20T04:40:23+5:30
नाशिक येथील मविप्र समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयांतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत चारा प्रक्रिया, सेंद्रिय शेती ...

कृषिकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
नाशिक येथील मविप्र समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयांतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत चारा प्रक्रिया, सेंद्रिय शेती व मधुमक्षिकापालन याबाबत मार्गदर्शन केले. जनावरांच्या शरीरातील ऊर्जा वाढविण्यासाठी शारीरिक वाढ, तंदुरुस्ती व स्वास्थ्यासाठी आवश्यक असणारी प्रथिने, क्षार व पोषकतत्त्वे यासाठी चारा व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच दूध उत्पादन व जनावरांच्या रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी व्यवस्थापन कसे करावे, याबद्दलची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या चारा व्यवस्थापन, मधुमक्षिकापालन, दूध उत्पादकता व रोगप्रतिकारशक्ती याबाबतच्या विविध प्रश्नांचे निरसन केले. कृषिकन्येला या कामासाठी प्रा.डॉ. आय. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. बी. सातपुते , प्रा.डॉ. भगुरे, प्रा. सी. एस. देसले, प्रा. के. जे. पानसरे, मधमाशी अभ्यासक डॉ. डी. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.