घरकुलासाठी वृध्देचे उपोषण
By Admin | Updated: November 22, 2014 01:19 IST2014-11-22T01:19:40+5:302014-11-22T01:19:40+5:30
रमाई घरकुलाचा लाभ मिळण्याची मागणी.

घरकुलासाठी वृध्देचे उपोषण
संग्रामपूर (बुलडाणा): तालुक्यातील दुर्गादैत्य येथील महिलेने रमाई घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी २0 नोव्हेंबरपासून पंचायत समिती कार्यालयासमोर उ पोषणाला सुरूवात केली आहे.
याबाबत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दुर्गादैत्य येथील शांताबाई सम्रत गव्हांदे ह्या २५ वर्षापासून स् थानिक रहिवासी असतानाही ग्रामपंचायत जागेची नोंद करीत नाही. यासाठी पंचायत समितीकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र या तक्रारीकडे संबंधि त अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने तक्रार करुनही उपयोग झाला नाही. ई क्लासच्या जागेवर राहत असताना ग्रामपंचायतने नोंद केली नाही. म्हणून मागासवर्गीय असतानाही रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याने सदर महिलेने लाभ मिळावा यासाठी आजपासून पंचायत समिती कार्यालयासमोर उ पोषणाला सुरूवात केली आहे.