निराधार योजनांचे अनुदान वाढेना
By Admin | Updated: February 3, 2015 00:17 IST2015-02-03T00:17:32+5:302015-02-03T00:17:32+5:30
वाढत्या महागाईतही अनुदान केवळ ६00 रुपये.

निराधार योजनांचे अनुदान वाढेना
बुलडाणा : विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाद्वारे निराधार, विधवा, अपंग यांच्यासाठी विविध योजना कार्यान्वित आहेत. या योजनांचा प्रारंभ झाल्यापासून याद्वारे मिळणार्या अनुदानामध्ये वाढ झालेली नाही. आजही निराधारांना मिळणारी ६00 रुपयांची मदत वाढत्या महागाईमध्ये तुटपुंजी ठरत आहे. त्यामुळे या अनुदान वाढीसाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, ङ्म्रावणबाळ राज्य नवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ नवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा नवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग नवृत्ती योजना अशा नावांनी या योजना कार्यरत आहेत. या योजनांमध्ये केंद्र व राज्य शासन दोघांचाही निधी समाविष्ट असला तरी अनुदानाची रक्कम ही ६00 रुपयांच्या वर जात नाही. तसेच हे अनुदानही दरमहा न मिळता ३ ते ४ महिन्याच्या फरकाने मिळत असते. त्यामुळे विविध बँकांसमोर अशा योजनांच्या लाभार्थ्यांची मोठी गर्दी उसळते. महागाईचा वाढता पारा लक्षात घेता हे ६00 रुपयांचे अनुदान अगदीच तुटपुंजे आहे. त्यातही हे अनुदान बँकेतून काढण्यासाठी बँकेची स्लिप भरण्याकरिताही अनेक ठिकाणी दलाल सक्रिय झाले असून, १0 ते १५ रुपयापर्यंतची रक्कम निराधारांकडून उकळल्या जाते. त्यामुळे या लाभार्थी योजनांची अनुदानाची रक्कम वाढविण्याची गरज आहे.