महाठगांची टोळी बुलडाणा शहरात दाखल
By Admin | Updated: October 3, 2015 02:34 IST2015-10-03T02:34:05+5:302015-10-03T02:34:05+5:30
सोने चमकविण्याचे आमिष दाखवून ४५ हजारांचा माल लंपास.

महाठगांची टोळी बुलडाणा शहरात दाखल
बुलडाणा : सोने चमकाविण्याच्या नावाखाली गणेश नगर भागात दोन आरोपींनी महिलांना फसविल्याचा खळबळजनक प्रकार २ ऑक्टोबर रोजी उघडकीस आला आहे. याप्रकरणी ४५ हजाराचे दागिने घेऊन फरार झालेल्या दोन आरोपींविरोधात शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. शहरातील गणेश नगर भागात दोन अज्ञात व्यक्ती आल्या. हनुमान मंदिराजवळ राहणार्या आशा विजय मते (वय ४६) यांना भेटून या दोघांनी तुमच्याकडचे सोने चमकावून देतो, असे सांगितले. त्यांच्या गोड गप्पांमध्ये आशाबाई फसल्या. त्यांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातले तसेच अंगठी काढून दिली; पण हातचलाखीने आरोपींनी सोने आपल्याकडे लपवून ठेवले आणि फरार झाले. त्यांनी ४५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याचे फिर्याद आशाबाईंचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रभागातील काही तरुणांनी या भामट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण ते मिळून आले नाही. आरोपींविरुद्ध कलम ४२0, ४0६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.