किराणा दुकानास आग; सहा लाख रुपयांचे नुकसान
By Admin | Updated: March 28, 2017 01:36 IST2017-03-28T01:36:18+5:302017-03-28T01:36:18+5:30
किराणा दुकानामध्ये शॉर्टसर्किट होऊन आग; सहा लाखाचे नुकसान

किराणा दुकानास आग; सहा लाख रुपयांचे नुकसान
दुसरबीड, दि. २७- येथील बसस्थानक परिसरात असलेले सावरिया किराणा दुकानामध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यामध्ये सहा लाखाचे नुकसान झाल्याची घटना २७ मार्च रोजी सकाळी घडली. दुसरबीड येथील सावरिया किराणा दुकानात २७ मार्च रोजी सकाळी ७ वाजता आग लागली. ही आग विद्युत शॉर्टसर्किटमुळे लागली ,यावेळी दुकानातील ५0 क्विंटल सोयाबीन पैकी ३0 क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले, तसेच ढेप ३0 क्विंटल, २५ पतरवाळी कट्टे, गोडेतेल कॅन २0 नग, पोहे ५0 कट्टे, अगरबत्ती, मसाला, चहाचे कट्टे यासह किराणा सामान जळून खाक झाले. पटवारी चव्हाण यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. यामध्ये जवळपास ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.