माॅडेल काॅलेजमध्ये स्वामी विवेकानंदांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:32 IST2021-09-13T04:32:58+5:302021-09-13T04:32:58+5:30
बिबी ते किनगाव जट्टू रस्त्याची दुरवस्था बिबी : बिबी ते किनगाव जट्टू पालखी मार्गाची दुरावस्था झाली असून वाहन ...

माॅडेल काॅलेजमध्ये स्वामी विवेकानंदांना अभिवादन
बिबी ते किनगाव जट्टू रस्त्याची दुरवस्था
बिबी : बिबी ते किनगाव जट्टू पालखी मार्गाची दुरावस्था झाली असून वाहन धारक त्रस्त झाले आहेत़ दाेन वर्षांपासून हा रस्ता खाेदून ठेवण्यात आल्याने वाहन धारकांसाठी डाेकेदुखी ठरत आहे़ याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे़
‘हर घर ई-साक्षर’ योजनेंतर्गत प्रशिक्षण
बुलडाणा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत प्रत्येक परिवारातील प्रत्येक व्यक्ती डिजिटल साक्षर व्हावा यासाठी प्रौद्योगिक मंत्रालय यांच्या सहयोगाने डिजिटल साक्षरता अभियान राबवण्यात येणार आहे. या योजनेला बुलडाण्यात ११ सप्टेंबरपासून सुरुवात झाली.
काेराेनाचे नियम पाळून सण साजरे करा
बुलडाणा : सर्वांनी कोरोनाचे नियम पाळून सण व उत्सव साजरे करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी केले. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जयस्तंभ चौक येथे झालेल्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते़
‘सत्यमेव जयते’च्या वतीने वृक्षारोपण
बुलडाणा : सत्यमेव जयते शिक्षण व बहुउद्देशीय संस्था द्वारा शनिवारी हाजीमलंग परिसरामध्ये वृक्षारोपण व नागरिकांना मोफत वृक्षाचे वितरण करण्यात आले. नितेश थिगळे यांच्या संकल्पनेतून चिखली रोड हाजीमलंग परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
गॅसदर वाढल्याने उज्ज्वलाचे लाभार्थी संकटात
बुलडाणा : गत काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर माेठ्या प्रमाणात वाढत आहेत़ त्यामुळे, उज्ज्वला याेजनेचे लाभार्थी संकटात सापडले आहेत़ गॅसचे दर कमी करण्याची मागणी उज्ज्वला याेजनेच्या लाभार्थ्यांनी शनिवारी केली़