ग्रामस्थांनी केले शहीद सुरेश राणे यांना अभिवादन
By Admin | Updated: December 6, 2014 00:12 IST2014-12-06T00:12:13+5:302014-12-06T00:12:13+5:30
मातोळा तालुक्यातील खरबडी येथे स्मृतिदिनी.

ग्रामस्थांनी केले शहीद सुरेश राणे यांना अभिवादन
मोताळा (बुलडाणा): १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धामधील शहीद सुरेश केशव राणे यांचा शहीद दिन ५ डिसेंबरला त्यांच्या खरबडी या गावात विविध कार्यक्रमांनी पार पडला.
ग्रामपंचायतीच्या समोर गावकर्यांच्यावतीने सरपंच पुष्पा गजानन सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नवृत्त शिपाई देवीदास वानखेडे, जि.प.सदस्य अनिल खाकरे, पं.स.सभापती संजय किनगे, वीरमाता दुर्गाबाई राणे, शिपाई सदाशिव घाटे, श्रीराम तेलंग, डॉ.नारखेडे, नंदकिशोर किनगे, भीमराव इंगळे, सुपडा राणे, रमेश राणे, गणेश किनगे, गजानन सोळंके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
छत्रपती बहुउद्देशीय युवा विकास संस्थेच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गावातील जवळपास २५0 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बोराखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.सतीश नारखेडे, त्यांची टीम व संस्थेचे अध्यक्ष संदीप सुपे व त्यांचे सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
म.पू.माध्यमिक शाळा खरबडी येथे मुख्याध्यापक अरुण खर्चे यांनी सुद्धा शहीद सुरेश केशव राणे यांच्या शहीद दिनानिमित्त श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास शाळा समितीचे अध्यक्ष विजय इंगळे उपस्थित होते.