संत संताजी जगनाडे महाराजांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:28 IST2021-01-14T04:28:19+5:302021-01-14T04:28:19+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते श्रीराम सराफ हे होते. यावेळी अभिमन्यू इंगळे, गजानन इंगळे, अशोक इंगळे यांनी संत संताजी जगनाडे ...

संत संताजी जगनाडे महाराजांना अभिवादन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते श्रीराम सराफ हे होते. यावेळी अभिमन्यू इंगळे, गजानन इंगळे, अशोक इंगळे यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती सांगितली. जगनाडे महाराज यांनी मणुवादी विचाराला मुठमाती देऊन बहुजन समाजाने संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर पुरुषांच्या विचाराला अनुसरून समाज जडणघडणीचे कार्य करावे. जात, पात, धर्म या पलीकडे जाऊन कार्य करावे, असे विचार गजानन इंगळे यांनी मांडले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद सोरमारे, विकास इंगळे, गजानन खरात, भगवान बेंदाडे, माजी सैनिक महादेव गवळी, देवानंद पोधाडे, सोमेश इंगळे, विजय इंगळे, संदीप सोनुने, सुधीर इंगळे, राजू गप्पे, माजी सैनिक प्रकाश घोडके उपस्थित होते.