Greetings to Saint Ravidas Maharaj | संत रविदास महाराजांना अभिवादन

संत रविदास महाराजांना अभिवादन

मेहकर: संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मेहकर येथे शनिवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत रविदास महाराजांना अभिवादन करण्यात आले.

चर्मकार बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या संत श्री गुरू रविदास महाराजांची जयंती कोरोनाच्या नियमांचे पालन करून अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. येथील मे. ए. सो. विद्यालयात असलेल्या संत रविदास महाराजांच्या पुतळ्याचे उपप्राचार्य हेमंत कविमंडण, जुगराज पठ्ठे यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जुगराज पठ्ठे यांनी संत रविदास यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. चर्मकार बांधवांनी विज्ञानवादी होऊन, तसेच सामाजिक एकजुटता ठेवून आपली मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी दीपक पहारे, महेंद्र गोवेकर, सुनील खरात, धनराज चिखलेकर, राम पठ्ठे, राजू पहारे, दीपक परमेश्वर, गजानन शिरे, सचिन मोहरील, दिलीप दुर्योधन यांची उपस्थिती होती.

Web Title: Greetings to Saint Ravidas Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.