राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:30 IST2021-01-13T05:30:58+5:302021-01-13T05:30:58+5:30
सर्वप्रथम महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर, अलकाताई पाठक, रेखाताई पोफळकर यांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात ...

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
सर्वप्रथम महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर, अलकाताई पाठक, रेखाताई पोफळकर यांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी आमदार विजयराज शिंदे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. घराघरात छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज तयार होण्यासाठी प्रत्येक घरात आधी माँसाहेब जिजाऊ तयार होणे गरजेचे आहे. माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन विचारांचा आदर्श आपल्या जीवनात घेणे हीच खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन विजयराज शिंदे यांनी केले. कार्यक्रमास भाजप पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष पुरषोत्तम लखोटिया, तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, प्रभाकर वारे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, विधि आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन पवार, ज्ञानेश्वर राजगुरे, दत्ताभाऊ पाटील, नगरसेवक अरविंद होंडे, गोविंद सराफ, मंदार बाहेकर, वैभव इंगळे, भाजयुमो शहराध्यक्ष विनायक भाग्यवंत, शिवदास सुरडकर, गोपालसिंह राजपूत, चंद्रकांत पाथरकर, दिलीप तोटे, प्रदीप तोटे, राजेंद्र पवार, किरण नाईक, सोनू बाहेकर, मोहम्मद सोफियान, राशिद शेख, नितीन बेंडवाल, सोहम झाल्टे, रवि संगेले, आकाश जाधव, विजय मोरे, पवन बगाडे, संजय जुंबड, कुलदीप ठाकरे, आशिष व्यवहारे, व्ही.एफ. राऊत, समाधान शेळके, आनंद झोटे, अनिल गाढे, किसनराव खेडेकर, नारायण तोंडीलायता, आशिष दोडे आदी उपस्थित होते.