भगवानदास गुप्त जयंतीनिमित्त अभिवादन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:36 IST2021-04-20T04:36:03+5:302021-04-20T04:36:03+5:30
अतिशय प्रतिकूल आणि संकटाच्या परिस्थितीमध्ये कार्य करण्याची शिकवण लालाजींनी आपल्या स्वत:च्या जीवनातून दिली. आज कोरोनाच्या भीषण परिस्थितीमध्ये स्व. लालाजींच्या ...

भगवानदास गुप्त जयंतीनिमित्त अभिवादन !
अतिशय प्रतिकूल आणि संकटाच्या परिस्थितीमध्ये कार्य करण्याची शिकवण लालाजींनी आपल्या स्वत:च्या जीवनातून दिली. आज कोरोनाच्या भीषण परिस्थितीमध्ये स्व. लालाजींच्या संयमी व खंबीर व्यक्तिमत्त्वाची आठवण प्रकर्षाने होत आहे. त्यांच्या शिकवणीतून आपण आजच्या या विपरित व कठीण परिस्थितीवर संयम व सेवाभावाच्या मार्गाने मात करण्याचा संकल्प यावेळी चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीष गुप्त यांनी केला. बँकेच्या सभागृहात स्व. भगवानदास गुप्त यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, उपाध्यक्ष पुरूषोत्तम दिवटे, संचालक मनोहरराव खडके, शैलेश बाहेती, सुनीता भालेराव, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य उमेश लढ्ढा, तज्ज्ञ संचालक आनंद जेठाणी, स्थानिक शाखा सल्लागार प्रकाश हरगुणांनी, नामदेवराव भराड, विजय सिसोदिया, बँकेचे सरव्यवस्थापक संजय भंगिरे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.