स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांना अभिवादन
By Admin | Updated: July 2, 2014 23:56 IST2014-07-02T23:49:18+5:302014-07-02T23:56:48+5:30
स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंती निमित्त बुलडाणा लोकमत जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांना अभिवादन
बुलडाणा : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंती निमित्त लोकमत जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक व पत्रकारीतेच्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वर्षा वनारे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व बाबूजींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी माहिती कार्यालयाचे सहाय्यक माहिती अधिकारी प्रकाश माळोदे, जिल्हा सेवा नवृत्तांची कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ.मधुकर पर्हाड, प्राचार्य जयंत रायबोर्डे, माजी प्राचार्य आर. डी. जाधव, जयकुमार दर्डा आदी उपस्थित होते. ङ्म्रद्धेय बाबुजींच्या प्रतिमेला लोकमतचे वार्ताहर प्रकाश सांखला, ताहेर अली, अनिल वाघ, बुलडाणा शहर वितरक रत्नदिप तायडे, गोविंद तायडे, समाधान कुर्हाडे, यांचेसह तुषार कपाटे, त्रिशुल खारोडे, वितरण उपमहाव्यवस्थापक प्रकाश वानखडे, शरद गावंडे, प्रमोद गावंडे, वितरण प्रतिनिधी नरेंद्र गरोले, मुख्य उपसंपादक राजेश शेगोकार, उपसंपादक सिद्धार्थ आराख, हर्षनंदन वाघ, निलेश शहाकार, ङ्म्रीकांत भुसारी, कासीम खलील, गिरीष पोदूटवार, प्रविण थोरात, गणेश जाधव, अमोल जाधव आदींनी अभिवादन केले.