गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:26 IST2021-06-04T04:26:25+5:302021-06-04T04:26:25+5:30

शिवालयात गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून ...

Greetings to Gopinath Munde | गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

शिवालयात गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विजयराज शिंदे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. गोपीनाथ मुंडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श आजही आमच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे, तसेच त्यांच्या विचारांचे पाईक होणे ही खरी आदरांजली ठरेल, अशी भावनाही शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित किसान मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक वारे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव शालिनी बुंधे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष रवींद्र ढोकणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर, तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे, प्रकाश राजगुरे, राजेंद्र पवार, गौरव राठोड, नगरसेवक मंदार होंडे, मंदार बाहेकर, महिला जिल्हा सरचिटणीस अलका पाठक, सुचिता उमाळे, शिल्पा भगत, चंदा पुंडे, लता तायडे, माया पद्ममने, गणेश पांडे, बाळू ठाकरे, संजय जुंबड, कुलदीप पवार, समाधान मोहिते, भुजंगराव सावळे, अनंता शिंदे, यतिन पाठक, अंकुश भालेराव, सतीश हिंगने, भारत गव्हाने, आशिष दोडे, विनायक भाग्यवंत, दत्ता पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Gopinath Munde