दिनदयाल उपाध्याय यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:33 IST2021-02-12T04:33:01+5:302021-02-12T04:33:01+5:30
११ फेब्रुवारी रोजी जनसंघाचे संस्थापक महामंत्री, एकात्म मानवतावादाचे प्रणेते, अंत्योदयचे आग्रही स्व.दीनदयाल उपाध्याय यांचे पुण्यतिथी निमित्त बुलडाणा भाजपा जनसेवा ...

दिनदयाल उपाध्याय यांना अभिवादन
११ फेब्रुवारी रोजी जनसंघाचे संस्थापक महामंत्री, एकात्म मानवतावादाचे प्रणेते, अंत्योदयचे आग्रही स्व.दीनदयाल उपाध्याय यांचे पुण्यतिथी निमित्त बुलडाणा भाजपा जनसेवा कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करुन सर्वप्रकारचे बळ देणार, असा विश्वास भाजपा बुलडाणा जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांनी यावेळी व्यक्त केला. महिलांनी महिला आघाडीत सक्रिय काम करावे, महिला संघटन कार्य हे व्यापक आहे, महिला संघटन बळकट झाल्यास पक्षाचे अर्धे कार्य पार पडते. असा विचार व्यक्त करित समर्पण करून भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सिंधूताई खेडेकर यांनी स्व. दिनदयाल यांनी अभिवादन केले. यावेळी नगर सेवक गोविंद सराफ यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक भाजपा शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी केले. याप्रसंगी नगरसेवक अरविंद होंडे, मंदार बाहेकर, बाळासाहेब गिऱ्हे, वर्षाताई पाथरकर, सोहम झाल्टे, प्रितेश बेदमुथा, हर्षल जोशी, प्रदिप सोनटक्के, आषिश व्यवहारे, डॉ. राजेश्वर उबरहंडे, नितीन बेंडवाल, गौरव राठोड, विनायक भाग्यवंत, पंकज राजपूत, अल्काताई पाठक, उषाताई पवार, विजय मोरे, धारुल चिम, बबनराव पाटील, श्रीकृष्ण मख यांची उपस्थिती होती.