गीत गायनाने छत्रपती शिवरायांना अभिवादन ! - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:52 IST2021-02-23T04:52:22+5:302021-02-23T04:52:22+5:30

चिखली : तालुक्यातील महात्मा फुले लोककला बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ जांभोरा व कोलाराच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ऑनलाईन ...

Greetings to Chhatrapati Shivaji by singing songs! - A | गीत गायनाने छत्रपती शिवरायांना अभिवादन ! - A

गीत गायनाने छत्रपती शिवरायांना अभिवादन ! - A

चिखली : तालुक्यातील महात्मा फुले लोककला बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ जांभोरा व कोलाराच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ऑनलाईन पद्धतीने व गीते सादर करून साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करण्यात आले. याप्रसंगी संजयकुमार निकाळजे यांनी पहिलं माझं कवन... शूर शिवबाला नमन... या गीतातून अभिवादन केले. गौतम अंभोरे यांनी शूर शिवबा मावळ्यांचा राणा हे गीत सादर केले. संगीता निकाळजे यांनी दोनच राजे इथे जन्मले... हे गीत गाऊन अभिवादन केले. यावेळी ढोलकपटू राजरत्न अंभोरे, वैशाली यांनी आपली कला सादर केली. कोविड १९ आणि संचार बंदीचे कायदेशीर अनुपालन करून नियमानुसार या कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने सादरीकरण करण्यात आले. रामदास मलवार व प्रीतमकुमार मिसाळ यांनी हार्मोनियमची उत्तम साथ दिली. यावेळी भास्कर सोळंकी, गजानन सोळंकी, रमेश गवई, भीमराव मघाडे, राजू जाधव, रंजना गवई, लता सोळंकी, चैतन्या निकाळजे, ज्योती वाघ, हर्ष निकाळजे, सुनील गवई, धनंजय खंडार, आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Chhatrapati Shivaji by singing songs! - A