साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयास हिरवा कंदील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:57 IST2017-09-24T23:57:47+5:302017-09-24T23:57:53+5:30

सिंदखेडराजा : साखरखेर्डा गावाची लोकसंख्या पाहता येथे  तत्कालीन आरोग्यमंत्री तथा मातृतीर्थ सिंदखेडराजा म तदारसंघाचे माजी आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी ग्रामीण  रुग्णालय मंजूर केले होते; परंतु १0 वर्षापासून मंजूर झालेल्या  या ग्रामीण रुग्णालयालाच्या कामाला मुहूर्त सापडत नव्हता.  दरम्यान बुधवारला साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या  उभारणीसाठी आरोग्य मंत्री सावंत यांनी एक कोटी रुपये निधी  उपलब्ध करून दिल्याने या ग्रामीण रुग्णालयाला हिरवा  कंदील मिळाला आहे.

Green lantern to rural hospital in sugarchers! | साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयास हिरवा कंदील!

साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयास हिरवा कंदील!

ठळक मुद्देदहा वर्षांपासून केवळ मंजुरात रुग्णालयाच्या उभारणीसाठी एक कोटी निधी प्राप्त

अशोक इंगळे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : साखरखेर्डा गावाची लोकसंख्या पाहता येथे  तत्कालीन आरोग्यमंत्री तथा मातृतीर्थ सिंदखेडराजा म तदारसंघाचे माजी आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी ग्रामीण  रुग्णालय मंजूर केले होते; परंतु १0 वर्षापासून मंजूर झालेल्या  या ग्रामीण रुग्णालयालाच्या कामाला मुहूर्त सापडत नव्हता.  दरम्यान बुधवारला साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या  उभारणीसाठी आरोग्य मंत्री सावंत यांनी एक कोटी रुपये निधी  उपलब्ध करून दिल्याने या ग्रामीण रुग्णालयाला हिरवा  कंदील मिळाला आहे.
मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा गावाची  लोकसंख्या पाहता येथे तत्कालीन आरोग्यमंत्री तथा मातृतीर्थ  सिंदखेडराजा मतदारसंघाचे आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी  ग्रामीण रुग्णालय मंजूर केले होते. मंजूर झालेल्या ग्रामीण  रुग्णालयाची दहा वर्षांपासून ग्रामस्थांना प्रतीक्षा होती.   साखरखेर्डा हे गाव सिंदखेडराजा तालुक्यात सर्वात मोठे गाव  असून, लोकसंख्या २0 हजार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रा त डॉक्टरांची रिक्तपदे प्राथमिक सुविधांचा अभाव या सर्व  बाबी लक्षात घेता आणि २२ खेड्यांची लोकसंख्या गृहीत  धरून येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, म्हणून सतत मागणी  करण्यात येत होती. तत्कालीन आ.डॉ.राजेंद्र शिंगणे,  आरोग्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालय आणि  शेंदुर्जन प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरात दिली होती; परंतु  हा प्रश्न १0 वर्षांपासून प्रलंबित पडला होता. 
अनेक वेळा ग्रामपंचायतीने जागेची फाइल सादर करूनही द प्तर दिरंगाईमुळे ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न रेंगाळत पडला हो ता. आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनासुद्धा ग्रामीण  रुग्णालयासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली होती.  आ.डॉ.शशिकांत खेडेकर, खा.प्रतापराव जाधव, शिवसेना  उपजिल्हाप्रमुख बाबूराव मोरे, सरपंच महेंद्र पाटील, युवा सेना  उपजिल्हा प्रमुख संदीप मगर, मतदारसंघ संपर्क प्रमुख  अजयसिंह ठाकूर यांनी आरोग्यमंत्री ना.दीपक सावंत यांना प्र त्यक्ष मंत्रालयात भेटून संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून प्रस् ताव सादर केले.   दरम्यान, साखरखेर्डा येथील ग्रामीण  रुग्णालयाच्या उभारणीसाठी आरोग्यमंत्री सावंत यांनी एक  कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याने या ग्रामीण  रुग्णालयाला हिरवा कंदील मिळाला आहे.

ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीचे आदेश
साखरखेर्डा येथील युवा नेते महेंद्र पाटील यांनी ग्रामीण  रुग्णालयासाठी जागा निश्‍चित करून ग्रामीण रुग्णालयासाठी  तत्काळ मंजुरात द्यावी, असे पत्र आ.डॉ. शशिकांत खेडेकर  यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना मुंबई येथे बुधवारी सादर  केले. यावेळी ना.सावंत यांनी संबंधित अधिकार्‍यांना ग्रामीण  रुग्णालयाच्या उभारणीसाठी आदेश दिले. त्यांनी तत्त्वत:  मान्यता देऊन लवकरच ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू  होईल, असे आश्‍वासन खा.प्रतापराव जाधव,  आ.डॉ.शशिकांत खेडेकर आणि सरपंच महेंद्र पाटील यांना  दिले.

Web Title: Green lantern to rural hospital in sugarchers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.