शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

बुलडाणा जिल्ह्यात भीषण आग; शेकडो जनावरे मृत्युमुखी

By admin | Updated: April 2, 2017 02:01 IST

३0 घरे जळाली; धान्यासह लाखोंचे नुकसान.

जानेफळ (जि. बुलडाणा), दि. १- येथून जवळच असलेल्या उटी येथे शनिवारी रात्री १0.३0 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत ३0 घरे जळून खाक झालीत. याशिवाय ४ बैल, ४0 बकर्‍या आणि काही कोंबड्या ठार झाल्याचे वृत्त आहे. आगीत घरांमधील धान्यदेखील जळून कोळसा झाले. यात लाखोंची संपत्ती नष्ट झाली. शनिवारी रात्री उटी येथील ग्रामस्थ जेवण आटोपून झोपण्याच्या तयारी होते. अचानकच गावाच्या पश्‍चिमेकडून धूर निघत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी तिकडे धाव घेतली. पंडित पाटील धोटे यांच्या शेताजवळील लोकवस्तीला आगीने वेढा घातलेला दिसून आला. वार्‍यामुळे ही आग अधिकच वाढत चालली होती. आग एवढी भीषण होती, की चार बैल, ४0 बकर्‍या व काही कोंबड्या जळून कोळसा झाल्या. याशिवाय प्रल्हाद आंधळे, दिनकर आंधळे, चांदखाँ इनायत खाँ, इनायत खाँ अमीर खाँ, शहेनाजबी सरदार खाँ, हसीना बी रहीम खाँ, गणेश आंधळे, शे. हारुण शे. नूर, शे. हबीब शे. नूर, शे. नूर शे. चाँद, जुरावर खाँ पठाण, बंडू चांदणे यांची घरे जळून खाक झालीत. घरातील संसारोपयोगी साहित्य तसेच धान्यदेखील जळून खाक झाले. चाँद खॉ इनायत खाँ यांच्या घरापासून आगीला सुरुवात झाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सुरुवातीला गावकर्‍यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. एक तासाने मेहकर येथील अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.