पोलिओमुक्तीसाठी झटणा-या कर्मचा-यांप्रती कृतज्ञता!

By Admin | Updated: February 20, 2016 02:40 IST2016-02-20T02:15:32+5:302016-02-20T02:40:52+5:30

आरोग्यम् बुलडाणा ग्रुपचा स्तुत्य उपक्रम: लसीकरण बुथवरील कर्मचा-यांचा नागरिकांनी सत्कार करावा!

Gratitude for the employees of polio! | पोलिओमुक्तीसाठी झटणा-या कर्मचा-यांप्रती कृतज्ञता!

पोलिओमुक्तीसाठी झटणा-या कर्मचा-यांप्रती कृतज्ञता!

चिखली (जि. बुलडाणा) : तब्बल २0 वर्षांंच्या अथक लढय़ानंतर सन २0११ मध्ये भारतातून पोलिओचे निर्मूलन होऊन सन २0१४ मध्ये अधिकृतरीत्या पोलिओमुक्त भारताची घोषणा झाली आहे. भारतातून पोलिओचा समूळ नायनाट करण्याच्या लढय़ात गेली २व वष्रे सेवा पुरविणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांचा यात सिंहाचा वाटा आहे. नेमकी हीच बाब हेरून पोलिओमुक्तीच्या या लढय़ात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची मोहीम आरोग्यम् बुलडाणा ग्रुपने हाती घेतली असून, यानुषंगाने व्यापक प्रमाणावर जनजागृतीही करण्यात येत आहे.

Web Title: Gratitude for the employees of polio!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.