लेखणीबंद आंदोलन
By Admin | Updated: June 27, 2014 00:28 IST2014-06-26T23:53:00+5:302014-06-27T00:28:10+5:30
देऊळगावराजा पंचायत समिती कर्मचार्यांवर नेत्यांची अरेरावी; बेमुदत काम बंदचा इशारा

लेखणीबंद आंदोलन
देऊळगावराजा : पंचायत समिती कार्यालयातील सांख्यिकी विस्तार अधिकारी जी.एस.डोभाळ यांच्याशी आरोरावी करून जिल्हा काँग्रेस कमीटीचे सचिव प्रदीप नागरे यांनी अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी पंचायत समितीच्या कर्मचार्यांनी निषेध व्यक्त करीत २५ जून रोजी एक दिवशीय लेखणी बंद आंदोलन केले. यासंदर्भात कर्मचार्यांच्या वतीने मुख्यधिकार्यास निवेदन देण्यात आले. १५ दिवसात संबधितावर कारवाई न झाल्यास बेमुदत काम बंद करण्याचा इशाराही कर्मचार्यांनी दिला आहे.
देऊळगांवराजा पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी जी.एस.डोभाळ यांना २४ जून रोजी प्रदिप नागरे यांनी भ्रमणध्वनीवरून जिल्हा परिषद सेसफंड योजना अतंर्गत निवड झालेल्या लाभाथ्यार्ंच्या साहित्या वाटपाबाबत माहिती विचारली होती. यावर एस.आर.काळे यांनी जी.एस.डोभाळा यांचेशी संर्पक करण्याचे त्यांना सांगितले. मात्र दिलेल्या महितीवर प्रदिप नागरे यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे नागरे यांनी जी.एस.डोभाळ यांचेशी शाब्दिक वाद घातला. त्यावर डोभाळ यांनी त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रदिप नागरे यांनी आरेरावी करीत त्यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. दरम्यान या घटनेमुळे कर्मचार्यांची मानसिक स्थिती ढसळली असून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम शासकीय कामावर पडत असल्यामुळे वरिष्ठ स् तरावरून अश्या प्रकाराला लगाम लावणे आवश्यक झाल्याचे निवेदनात नमुद केले आहे. दरम्यान दुपारी तिन वाजता पंचायत समिती सभापती सिद्धिकी कुरेशी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिपक बोरकर, उपसभापती सुधाकर म्हसके, राष्ट्रवादी नेते सुधाकर झोटे यांनी लेखणी बंद आंदोलनाला भेट दिली असता, त्यांच्या विनंतीला मान देवून लेखणी बंद आंदोलन मागे घेण्यात आले.