१९३0 शेतकर्यांचे ४ कोटी १४ लाखाचे अनुदान रखडले
By Admin | Updated: June 28, 2014 22:40 IST2014-06-28T22:27:14+5:302014-06-28T22:40:45+5:30
१९३0 शेतकर्यांचे तब्बल ४ कोटी १४ लाख १७ हजार रु. अनुदान अद्यापपर्यंत शासनाने दिले नसल्याने

१९३0 शेतकर्यांचे ४ कोटी १४ लाखाचे अनुदान रखडले
धाड : कमी पाण्याचा वापर होऊन कृषी उत्पादन घेण्यासाठी ह्यसुक्ष्म सिंचनह्ण योजना सर्वत्र राबवली. यासाठी शेतकर्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन संचावर अनुदान देऊन प्रोत्साहन दिले. मात्र बुलडाणा तालुक्यात आजरोजी गेल्या वर्षभरापासून १९३0 शेतकर्यांचे तब्बल ४ कोटी १४ लाख १७ हजार रु. अनुदान अद्यापपर्यंत शासनाने दिले नसल्याने या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.सन २0१३ मध्ये बुलडाणा तालुक्यातून २७५६ शेतकर्यांचे अनुदान प्रस्ताव कृषी विभागास प्राप्त झाले. पैकी कृषी विभागास सन २0१३ मध्ये १ कोटी ३७ लाख ३ हजार रु. निधी प्राप्त झाला. यामधून कृषी विभागाने ८२६ शेतकर्यांचे प्रस्ताव मार्गी लावत अनुदान वाटप केले. तर आज १९३0 शेतकर्यांचे प्रस्ताव प्रलंबित पडून असल्याने ते आर्थिक अडचणीत आहेत. कृषी विभागाकडून सुक्ष्म सिंचन योजनेत ठिबक व तुषार सिंचन संचाचे खरेदीवर अत्यल्प भूधारक शेतकर्यांस ७५ टक्के अनुदान तर सर्वसाधारण भूधारक शेतकर्यांस ५0 टक्के अनुदान देणारी ही प्रभावी योजना आहे. ठिबक सिंचन संच व तुषार सिंचन संच हे शेतकर्यांनी स्थानिक पातळीवर दुकानदारांकडून पूर्ण किमतीनी खरेदी करुन आवश्यक कागदपत्राची पूर्तता करुन अनुदानाचा प्रस्ताव कृषी विभागाचे कार्यालयात सादर करावा. याठिकाणी सर्व प्रकरणांची ऑनलाईन नोंदी होऊन शासनाकडून त्यास मान्यता मिळाल्यानंतर थेट अनुदान हे शेतकर्यांचे खात्यात जमा होते.
पुर्वी मात्र स्थानिक पातळीवरील कृषी दुकानदार हे शासकीय अनुदान रक्कम वगळून ठिबक व तुषार संच शेतकर्यांना विक्री करत आणि नंतर मिळवीत यामध्ये शेतकर्यांना शासकीय कार्यालयाच्या येरझार्यातून सुटका मिळत होती. परंतु गेल्या काही वर्षात ही पद्धत शासनाने बदलल्याने शेतकर्यांना आपल्या अनुदानासाठी कृषी कार्यालयाचे उंबरठे झिवण्याची वेळ आली आहे.यामध्ये प्रत्येक शेतकर्यास नगदी रोख रक्कम पूर्ण भरुन ठिबक व तुषार संच खरेदी करावे लागतात, यासाठी बहुतांश शेतकर्यांनी कर्ज काढून हे संच खरेदी केली आहे. मात्र अनुदान न दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.