शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक अपघातात बिबीतील आजी आणि नातीचा मृत्यू, पार्थिव आणण्यासाठी खासगी वाहन रवाना

By निलेश जोशी | Updated: October 8, 2022 17:03 IST

नाशिक अपघातामध्ये बिबी येथील दोघींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बिबी येथून एका खासगी वाहनाद्वारे अशोक दगडू मिरे व अन्य काही सहकारी हे नाशिक येथे दोघींचे मृतदेह आणण्यासाठी दुपारी निघाले होते.

बुलढाणा : नाशिक येथे झालेल्या भीषण अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बिबी येथील आजी व नातीचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर (५०) आणि कल्याणी आकाश मुधोळकर (३) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातामध्ये एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोणार तालुक्यातील बिबी येथून ७ ऑक्टोबरला रात्री ११ ते ११:३० वाजेच्या सुमारास लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर ही महिला तीन वर्षाच्या कल्याणीसह लक्ष्मीबाईच्या मुलीची मुलगी पायल शिंदे (७) आणि कल्याणीचा पाच वर्षाचा भाऊ चेतन मुधोळकर यांच्यासह बसली होती. दरम्यान यातील चेतन आणि पायल हे या अपघातामध्ये जखमी असून त्यांच्यावर नाशिक येथे उपचार करण्यात येत आहेत.

हे कुटुंब बिबी परिसरात गेल्या दोन वर्षापूर्वी त्यांच्या नातेवाईकांच्या सहकार्याने राहाण्यासाठी आले होते. मोलमजुरी करून ते उपजिविका करत होते. चिंतामणी ट्रॅव्हल्सद्वारे ते मुंबईला कामासाठी जात असावे, असा कयास आहे. ते नेमके कोठे जात होते याची सविस्तर माहिती मात्र मिळू शकली नाही. लक्ष्मीबाई मुधोळकर समवेत तिची तीन वर्षाची नात कल्याणी आकाश मुधोळकर, पायल शिंदे (७) आणि चेतन मुधोळकर हेही जात होते.

खासगी वाहनाद्वारे नातेवाईक नाशिकला -नाशिक अपघातामध्ये बिबी येथील दोघींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बिबी येथून एका खासगी वाहनाद्वारे अशोक दगडू मिरे व अन्य काही सहकारी हे नाशिक येथे दोघींचे मृतदेह आणण्यासाठी दुपारी निघाले होते. दरम्यान या दोघींचीही अेाळख महसूल यंत्रणेच्या माध्यमातून पटविण्यात आली होती. सोबतच दोघींच्या मृत्यूची माहिती बिबी येथील पोलिस निरीक्षक एल. डी. तावरे यांनी मृतकांच्या नातेवाईकाना दिली.

ट्रॅव्हल्स एजंटचा अजब तर्क -बिबी येथून काही जण चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये कदाचीत बसेल असावेत त्याची आपणास कल्पना. ज्या व्यक्ती बसल्या त्या पनवेल मार्गे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सद्वारे गेल्याचे बिबी येथील ट्रॅव्हल्स एजंट बापू देशमुख यांनी सांगितले. सोबतच रात्री जोरदार पाऊस असल्याने नेमके बसद्वारे कोण गेले हे सांगता येत नसल्याचे ते म्हणाले. सोबतच आपल्याकडून बुकींग झालेली नव्हती असेही देशमुख म्हणाले. त्यामुळे या ट्रॅव्हलसाठीचे बिबी येथील या मृत व जखमी व्यक्तींचे तिकीटाचे बुकिंग कोणी केले होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी होते या कयासास पुष्टी मिळत आहे. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनीही त्यानुषंगानेच प्रसारमाध्यमांशी बोलतांना संकेत दिले होते. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकDeathमृत्यू