ग्रामसेवकास मारहाण

By Admin | Updated: May 19, 2014 00:36 IST2014-05-17T23:50:38+5:302014-05-19T00:36:40+5:30

हिंगणे बाळापूर येथील सरपंचाने ग्रामसेवकास केली मारहाण .

Gramsevas beat up | ग्रामसेवकास मारहाण

ग्रामसेवकास मारहाण

जळगाव जामोद : तालुक्यातील हिंगणे बाळापूर येथील सरपंच गजानन भानुदास मानकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक अनिल रामदास वैद्य यांना मारहाण केली. या मारहाणीत ग्रामसेवक वैद्य गंभीर जखमी झाले. सदर घटना आज १७ मे रोजी घडली. याप्रकरणी जळगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून, सरपंचाला अटक करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने सर्वसाधारण ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता ग्रामसेवक अनिल वैद्य हे सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात पोहचले. त्यानंतर सरपंच गजानन मानकर हे कार्यालयात पोहचले असता त्यांनी गामसेवकाला पैशाची मागणी केली असता ग्रामसेवकाने नकार दिला. त्यावरून प्रथम शाब्दिक चकमक झाली. हा वाद विकोपाला जाऊन सरपंच मानकर यांनी काठीने ग्रामसेवक वैद्य यास जबर मारहाण केली. यात वैद्य गंभीर जखमी झाले. या प्रकरणात ग्रामस्थांनी मधस्थी करून प्रकरण आटोक्यात आणले. याबाबतची महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रशांत खोद्रे यांनी जळगाव पोलिसात तक्रार दिली असता सरपंच मानकर यांच्याविरुद्ध भादंविच्या ३५३,३३२,३३३ व १८८ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली. ग्रामसेवक वैद्य यांच्यावर जळगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सामान्य रुग्णालय खामगाव येथे दाखल करण्यात आले. ग्रामसेवक संघटनेने या संदर्भात जिल्हाधिकारी बुलडाणा यांची भेट घेऊन सरपंच मानकर यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Gramsevas beat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.