ग्रामसेवकांचे आंदोलन चिघळले

By Admin | Updated: July 7, 2014 22:46 IST2014-07-07T22:44:26+5:302014-07-07T22:46:19+5:30

कारवाईचे संकेत : ग्रामीण भागातील कामे ठप्प

Gramsevak's agitation broke out | ग्रामसेवकांचे आंदोलन चिघळले

ग्रामसेवकांचे आंदोलन चिघळले

बुलडाणा: ग्रामसेवकांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाला एक आठवडा उलटला असून ग्रामीण भागातील कामे ठप्प झाल्याने ग्रामसेवकांचे हे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेूवन जिल्ह्यातील ५८0 ग्रामसेवकांना नोटीसेस बजावल्या आहेत. मात्र या नोटीसांनाही न जुमानता ग्रामसेवक मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाल्याने वेळप्रसंगी या ग्रामसेवकावर कठोर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहे. आपल्या विविध मागण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने १ जूलै पासून आंदोलन सुरू केले आहे. पहिल्या दिवशी मोर्चा काढून ग्रामसेवकांनी शक्ती प्रदर्शन केले. तर २ जुलै रोजी ग्रामपंचायतीच्या चाब्या व शिक्के गटविकास अधिकारी यांच्याकडे सोपवून कामकाजावर बहिष्कार टाकून ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. तेव्हापासून ग्रामीण भागातील शासन स्तरावरील सर्व कामे ठप्प झाले आहेत. सध्या विद्यार्थ्यांंंना शाळा प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे, शेतकर्‍यांना शेती पेरणीसाठी लागणारे दाखले तर शासकिय स्तरावरील विविध विकास कामाची अमंलबजावणी ठप्प आहे. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नसल्याची भुमिका ग्रामसेवक संघटनेने घेतल्याने याची गंभीर दखल घेत प्रशासनाने ग्रामसेवकांना काल नोटीसेस बजावल्या आहे.

Web Title: Gramsevak's agitation broke out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.